!-- afp header code starts here -->

भुसावळात उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरही 10 दिवसाआंड पाणी

अमृत रखडली : जीर्ण पाईपलाइनला गळती वाढली


In Bhusawal, even on the cusp of summer, water is supplied only every 10 days भुसावळ (6 फेब्रुवारी 2026) : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शहरातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला होता. निवडणूक होऊन पालिकेत राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे नगराध्यक्ष झाल्या मात्र शहरातील पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. शहरात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात दहा दिवसांनी पाणी मिळत आहे. यासोबतच उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच शहरात अनेक ठिकाणी पाइपलाइन गळती होत असल्याने दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शहराला आगामी काळात शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या अमृत योजनेचे कामही संथ गतीने सुरु आहे.

पाणी समस्या सुटणार कधी ?
तापीकाठावर वसलेल्या भुसावळला बारमाही पाणीप्रश्न भेडसावतो. अटल मिशन फार रेजुवेनशन एंड अर्बन ट्रांसफार्मेशन अर्थात अमृत योजना शहरात राबवली जात आहे. मात्र या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले नाही. दुसर्‍या टप्प्यातील कामांना गती असली तरी काही भागातील जलवाहिनी तसेच 11 जलकुंभ अपूर्ण आहेत. या कामाला चारवेळा मुदतवाढ देवूनही पहिला टप्पा अपूर्ण आहे. यासोबतच साडेपाच कोटींचा निधी खर्च करुन पाणीपुरवठा योजनेचे नुतनीकरण करण्यात आले, यानंतरही शहरातील रोटेशन एक दिवसाने कमी झाले नाही. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच पाइपलाइनची गळती रोखली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे उन्हाळ्यात शहराला मोठ्या टंचाईचा सामना करावा लागेल, अशी स्थिती आहे.

अमृतच्या कामांबाबत शंकाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार दौर्‍यात वर्षभरात भुसावळकरांना पाणी देवू, असे आश्वासन दिले खरे, मात्र टप्पा एक अपूर्ण असेल तर पाणी मिळेल कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टप्पा दोनचे काम पूर्ण झाले तरी टप्पा एकच्या कामांचे काय? असा प्रश्न आहे. युध्दपातळीवर कामे श्रक्षिुं ठेवली तरी एक वर्षात पाणीपुरवठा करता येणार नाही, अशी सध्या अमृत योजनेची स्थिती आहे. यामुळे भुसावळकरांना आगामी काही वर्ष अमृतचे पाणी मिळेल काय? याबाबत शंकाच आहे.

जॅकवेल ते जलशुध्दीकरण केंद्र पाईपलाइन बदलणार
पाणीपुरवठा योजनेवरील बंधार्‍याची डागडूजी, पाणी उचल करुन जॅकवेलमध्ये टाकणे या उपाययोजना केल्या जात आहे. पंपिंग हाऊस ते जलशुध्दीकरण केंद्राची पाईपलाइन जीर्ण आहे, ती बदलल्यानंतर उचल वाढेल. यासोबतच रोटेशन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहोत. अमृत योजनेच्या कामांनाही गती देण्याचे नियोजन असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे म्हणाल्या.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !