!-- afp header code starts here -->

महाशिवरात्रीनिमित्त भुसावळात शिवमहापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रम

10 ते 21 फेब्रुवारीदरम्यान कलशयात्रा, कथा, हवन, शिवलिंग स्थापना व महाप्रसाद


On the occasion of Mahashivratri, Shiv Mahapurana recitation and various religious programs were organized in Bhusawal भुसावळ (6 फेब्रुवारी 2026) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भुसावळ शहरात शिवमहापुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी नगर प्रांगण, वरणगाव रोड, भुसावळ येथे होणार्‍या या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांना सहकुटुंब, इष्टमित्रांसह सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता भव्य कलशयात्रेने होणार असून, ही यात्रा रामेश्वर महादेव मंदिर, प्रल्हाद नगर येथून कथास्थळापर्यंत काढण्यात येणार आहे.

यानंतर 11 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान दररोज दुपारी 2.30 वाजता शिवमहापुराणाची सश्रद्ध कथा संपन्न होणार आहे.
दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9वाजता गायत्री हवन व रुद्राभिषेक करण्यात येणार असून, याच दिवशी दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर नर्मदेश्वर महादेव शिवलिंग स्थापना कार्यक्रमाअंतर्गत 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संभाजी नगर प्रांगण येथून महागणपती मंदिर, रामायण नगरपर्यंत नगर भ्रमण काढण्यात येणार आहे.

20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महागणपती मंदिर, रामायण नगर, वरणगाव रोड, भुसावळ येथे शिवलिंगाची विधिवत स्थापना होणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप दि. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता महाप्रसादाने होणार आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अर्थदानासाठी तसेच अधिक माहितीसाठी आशिष शशिकांत तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !