!-- afp header code starts here -->

पारोळा तालुक्यात धाडसी घरफोडी : चार लाख 28 हजारांचा ऐवज लांबवला


Daring burglary in Parola taluka : Valuables worth four lakh 28 thousand rupees stolen पारोळा (6 फेब्रुवारी 2026) : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 28 हजार 355 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पारोळा तालुक्यातील ढोली गावात घडली.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
तक्रारदार भरत नवल पाटील (60, रा.ढोली, ता.पारोळा, ह.मु. वर्धमान नगर) हे 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत बाहेर गावी गेल्याने संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवून नेले. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. चोरीला गेलेला माल: या घरफोडीत एकूण 75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत, ज्यांची बाजारभावानुसार किंमत 4 लाख 28 हजार 355 रुपये इतकी आहे. यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चैन, सोन्याची लहान माळ, फॅन्से डोरले मणी असा मुद्देमाल होता. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !