पाचोर्‍यानजीक कारला भीषण अपघात : जळगावातील दोन्ही तरुण ठार


A horrific car accident near Pachora : Both young men from Jalgaon killed पाचोरा (6 फेब्रुवारी 2026) : जळगावातील तरुणांच्या वाहनाला पाचोरा तालुक्यात भीषण अपघात झाल्याने पिंप्राळ्यातील दोन्ही तरुण जागीच ठार झाले असून अन्य एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात पाचोरा ते जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ गुरुवार, 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. मयत तरुण नाचणखेडा, ता.पाचोरा येथे हळदीच्या कार्यक्रमाला आल्याचे सांगण्यात आले.

हळदीच्या कार्यक्रमातून परतताना अपघात
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास पाचोरा-जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.

कारचा झाला चुराडा
वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला असावा आणि त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाल्याने वाहनाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला. या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील (27, पिंप्राळा, जळगाव) व प्रसन्न रवींद्र निमजे (21, पिंप्राळा, जळगाव) यांचा मृत्यू झाला. मयत श्रीरंग पाटीलचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. श्रीरंग हा परिवाराचा एकुलता मुलगा होता. त्यांचे वडिलांचे देखील काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगण्यात आले.

अपघात हे झाले जखमी
या अपघातात रोहित सोनार (23) हा तरुण गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत. निखील कच्छवा (25), अनिकेत कोळी (22), निलेश वाघ (23, पिंप्राळा, जळगाव) हे जखमी आहे. त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गाडीचा दरवाजा अडकून बसल्याने रुग्णवाहिका चालकांनी कारचा पत्रा तोडून मृतदेह बाहेर काढले. अपघात करणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !