!-- afp header code starts here -->

डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रतियोगितेत ताप्ती पब्लिक स्कूलची दक्षायणी सपकाळे राज्यात पहिली


Dakshayani Sapkal of Tapati Public School secured first place in the state in the Dr. Homi Bhabha Children’s Science Competition भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : मुंबईत डॉक्टर होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित बाल वैज्ञानिक प्रतियोगितेत भुसावळची ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दक्षायनी सुबोध सपकाळे हिने ग्रेट लेव्हल टू चे प्रमाणपत्र मिळवून राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळवला आहे.

ही प्रतियोगिता मुंबई सायन्स टीचर असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आली होती. या प्रतियोगितेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या प्रतियोगितेत दक्षायणी सपकाळे हिने आपले वैज्ञानिक विचार आणि कौशल्य दाखवले त्या बद्दल तीला ग्रेट लेव्हल टू चे प्रमाणपत्र व शिल्ड देऊन राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळाला आहे.

दक्षायणी सपकाळे ही ताप्ती पब्लिक स्कुल ची इयत्ता पाचवीतील या प्रतियोगितेत यश मिळवणारी जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थीनी आहे. तिच्या या यशा बद्दल स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर, व्हाईस प्रिंसीपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर सह शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

ती या प्रतीयोगीतेत राज्यातून पहिली आली असून आता तिची ग्रेट इंक्झामसाठी निवड झाली आहे. तिला इस्त्रोच्या टूरसाठी तीरवंतपूरम येथे नेण्यात येणार असून तेथे 12 हजार रु चे रोख व ट्रॉफी तसेच सन्माण चिन्ह व बक्षीस देण्यात येणार आहे.

या यशाबद्दल तीला शाळेचे शिक्षक व तिचे वडील सुबोध सपकाळे यांचे मार्गदर्शन लाभले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !