भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : कोलते फाउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 रोजी निरोप देण्यात आला.

प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शांतनु कुमार साहू उपस्थित होते. तसेच शाळेचे संचालक सी.ए.रोहित कोलते, मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उजाळा मिळाला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता दहा वीची विद्यार्थिनी शाम्भवी श्रीवास्तव हिने मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !