प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळहून नागपूरसाठी मेमू धावणार


Great relief for passengers: MEMU train to run from Bhusawal to Nagpur भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : विदर्भासह खान्देशातील प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्णतः अनारक्षित असून विदर्भ आणि खानदेश या दोन प्रमुख विभागांना जोडणार्‍या मार्गावरून हजारो रेल्वे प्रवाशांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01101 ही अनारक्षित भुसावळ नागपूर मेमो विशेष गाडी शनिवारी सात वाजून पन्नास मिनिटांनी भुसावळ येथून सुटेल आणि नागपूर येथे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01102 नागपूर भुसावळ विशेष मेमु गाडी त्याच दिवशी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी नागपूरहून सुटून रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी भुसावळ येथे पोहोचेल.

या विशेष गाडीला दोन्ही मार्गावरील बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, बोरगाव, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा आणि अजनी या 13 स्थानकांवर थांबे असणार आहेत.

या विशेष रेल्वेमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना नागपूर व भुसावळकडे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लग्नसराई तसेच सण उत्सवांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांना होणारे प्रचंड गैरसोय म्हणून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !