काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

विद्यार्थ्यांनी शिकत शिकत प्रत्यक्ष घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे


A children’s fun fair was held at Kahurkhede Zilla Parishad School काहूरखेडे, ता.भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 4 फेब्रुवारी 2026 रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे तसेच उपयुक्त वस्तूंचे स्टॉल लावून आपली कौशल्ये सादर केली.

उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्य लतिका झांबरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक समाधान जाधव, उपशिक्षिका ममता तडवी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ तसेच माध्यमिक विद्यालय बोहर्डी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ विक्रीस ठेवून व्यवहारज्ञान, स्वच्छता, संघभावना व आत्मविश्वास यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चाट, फरसाण, मिठाई, थंड पेये तसेच हस्तकला साहित्याचे स्टॉल विशेष आकर्षण ठरले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव तर आभार मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी मानले. बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका ममता तडवी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची गोडी निर्माण होऊन शालेय शिक्षणासोबत जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याचा उद्देश सफल झाल्याचे मत उपशिक्षक समाधान जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालकवर्ग व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !