अमळनेर तालुक्यात 24 वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार


A 24-year-old beggar woman was assaulted in Amalner taluka मालेगाव (7 फेब्रुवारी 2026) : भिक्षेकरी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात घडली. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

काय आहे नेमके प्रकरण ?
पीडित महिला 24 वर्षीय असून मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. सध्या ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एका झोपडीत ती एकटी असताना, संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा.अमळनेर) याने तिला गाठले. पीडित महिला ही तिथे एकटीच आहे, याची माहिती असतानाही आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

मारवड पोलिसात गुन्हा दाखल
पीडितेने या घटनेनंतर तात्काळ मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !