भुसावळात रोडरोमिओंनी घेतला कारवाईचा धसका : दामिनी पथकाकडून महाविद्यालयाच्या आवारात गस्त


Road romeos in Bhusawal have been deterred by the action taken: The Damini squad is patrolling the college premises भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढल्याने बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अशा रोडरोमिओंविरोधात कारवाईसाठी दामिनी पथकाला निर्देश दिले आहेत. शहरातील बाजारपेठ हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या आवारात या पथकाकडून आता गस्त घालून रोडरोमिओंवर कारवाई केली जाणार आहे. पथक सक्रिय होताच रोडरोमिओ गायब झाले आहेत.

शाळा-महाविद्यालयांभोवती रोडरोमिओंचा डेरा
शहरातील शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत अनेक नामांकित शाळा-महाविद्यालये आहेत तर शहरासह तालुकास्तरावरून अनेक विद्यार्थिनी ज्ञानाजर्नासाठी शहरात येतात मात्र शाळा व क्लास सुटल्यांनंतर मुलींची छेड काढण्यात येत असल्याची तक्रारी पाहता बाजारपेठ पोलिसांनी दामिनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले आहेत.

टारगटांची आता खैर नाही
बाजारपेठ हद्दीतील दामिनी पथकातर्फे शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. ट्रीपलसीट फिरणारे तसेच शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी नसताना महाविद्यालयाच्या आवारात घिरट्या मारणार्‍यांवर आता थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भारती काळे यांनी दिला आहे.

दररोज पथकातर्फे गस्त
दामिनी पथकाचे पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सीमा चौधरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका भोसले आदींच्या पथकाद्वारे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या आवारात गस्त घालण्यात येत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !