उत्कृष्ट कार्याची दखल : भुसावळ उपविभागातील टॉप कॉपचा गौरव


Recognition of outstanding work: Top cop from Bhusawal subdivision honored भुसावळ (8 फेब्रुवारी 2026) : पोलिस दलात उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणार्‍यांचा पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने शुक्रवार, 6 रोजी गौरव करण्यात आला. गुन्हे आढावा बैठकीत जानेवारी 2026 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अंमलदारांचा गौरव करण्यात आला. निवड झालेल्या अंमलदारांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट कार्याची दखल
भुसावळ विभागातील बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, तालुका पोालिस ठाणे, नशिराबाद पोालिस ठाणे, शहर वाहतूक शाखा येथील पोलिस कर्मचारी हे कामे करीत असतात, उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या कामाची दखल घेत डीवायएसपी केदार बारबोले यांनी अश्या सर्वच पोलिस कर्मचार्‍यांचा यावेळी क्राइम मिटींगमध्ये गौरव केला. यात भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे राहुल ताराचंद बेहेनवाल, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे महेंद्रसिंग हिलालसिंग पाटील, तालुका पोलीस स्टेशनमधील जयराम बाबुराव कानघुले, नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत रामभाऊ देशमुख, शहर वाहतूक शाखेतील शिवाजी संतोष पाटील यांचा गौरव केला. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, राहुल वाघ, महेश गायकवाड, महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांच्यासह उपविभागातील दुय्यम अधिकारी व सुमारे 50 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

गंभीर गुन्हे उघडकीस आणणार्‍या अधिकारी, अंमलदारांचा सत्कार
यावेळी मिटींगमध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हे उघडकीस आणून मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल व शस्त्रे हस्तगत करणार्‍या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा विशेष गौरव करण्यात आला. यात बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, योगेश माळी, अमर अढाळे तसेच महेंद्रसिंग पाटील, सचिन चौधरी, जावेद शहा, जीवन कापडे
हर्षल महाजन यांचा गौरव करण्यात आला.

असा केला होता मुद्देमाल हस्तगत
या अधिकारी व अंमलदारांनी गंभीर गुन्ह्यांतील संशयीत अटक करून सुमारे 2 लाख 85 हजार रूपये किंमतीचे सोने तसेच 3 गावठी पिस्टल, 6 जिवंत काडतुसे व 1 चॉपर हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली.

भुसावळ उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, पीडितांची तत्काळ दखल, गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास व दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी सातत्याने उत्कृष्ट कर्तव्य बजावत असून सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यानुसार ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे यावेळी डीवायएसपी केदार बारबोले यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !