जुनी पेन्शन योजना, आठव्या वेतन आयोगासह आठ तास ड्युटीच्या मागणीवर ठराव
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे 40वे अधिवेशन सोलापूर येथे पडले पार ; कार्यकारीणी जाहीर
A resolution was passed on the demands for the old pension scheme, the Eighth Pay Commission, and an eight-hour workday भुसावळ (8 फेब्रुवारी 2026) : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे 40वे अधिवेशन नुकतेच सोलापूर येथे पार पडले. अधिवेशनात नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, 8वा वेतन आयोग तातडीने अंमलात आणणे तसेच रेल्वेतील 12 तासांची ड्युटी 8 तासांवर आणणे या प्रमुख मागण्यांवर ठराव मंजूर करण्यात आले.या अधिवेशनास संपूर्ण मध्य रेल्वेमधील नागपूर, भुसावळ, मुंबई, पुणे व सोलापूर या विभागातील सुमारे 5 हजार रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
अधिवेशनात रेल्वे कर्मचार्यांच्या विविध ज्वलंत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एकूण 29 ठराव मंजूर करण्यात आले असून ते नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमन,नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
या प्रमुख ठरावांचा समावेश
अधिवेशनातील प्रमुख मंजूर ठरावांमध्ये महाप्रबंधक कार्यालय प्रांगण, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, श्रमिक कल्याण कायद्यातील कामगारविरोधी तरतुदी रद्द करणे, सर्व विभागांतील रिक्त पदे तात्काळ भरणे आदी मागण्यांचा समावेश आहे. याच अधिवेशात नवीन कार्यकारिणीची घोषणा केली, अधिवेशनाच्या शेवटी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी डॉ.प्रविण बाजपेयी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तसेच भुसावळ विभागातून मो. इरफान, एस. बी. पाटील व किशोर कोलते यांची बिनविरोध फेरनिवड झाली. भुसावळ येथे सोलापूर येथून आलेल्या सीआरएमएसच्या नवीन कार्यकारिणीचे रेल्वे स्टेशनवर आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.
भुसावळ विभागाची कार्यकारिणी
शेख मोहम्मद इरफान – विभागीय चेअरमन, विभागीय समन्वयक दीपक शर्मा, विभागीय सचीव एस. बी. पाटील, मुख्यालय सहायक महामंत्री धीरेंद्र पटसारिया, मुख्यालय सचीव ए. के. तिवारी, विभागीय संघटक गणेश सिंह, मुख्यालय सचीव (वर्कशॉप) किशोर कोलते, विभागीय महिला अध्यक्षा अलका चौधरी. मुख्यालय वर्किंग कमिटी सदस्य म्हणून सुंदरम झा, एच. एच. सरोदे, हरीश तिवारी, राजेंद्र वर्मा, प्रमोद महाशब्दे, आर. डी. नांदुरकर, पुष्पेंद्र कापडे, सिद्धार्थ पवार, दीपक अढाएंगे, प्रशांत वानखेड़े व उमाकांत बाउसकर यांची निवड करण्यात आली.


