बर्‍हाणपूरच्या व्यापार्‍याला कर्मचार्‍यांनीच लावले आठ लाखांचे चंदन : रावेर पोलिसात गुन्हा


Employees stole sandalwood worth eight lakhs from a Burhanpur businessman: A case registered at Raver police station रावेर (8 फेब्रुवारी 2026) : बर्‍हाणपूरच्या ड्रायफूट व्यापार्‍याला त्याच्याकडे कामाला असलेल्या दोघांनी तब्बल आठ लाख रुपयांचे चंदन लावल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
बर्‍हाणपूर येथील ड्रायफ्रूट आणि गरम मसाल्याचे व्यापारी दीपक सुरेश धरमानी (28) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दोन कर्मचारी त्यांच्या दुकानातील मालाची ग्राहकांकडून वसुली करण्याचे काम करतात मात्र 6 जुलै 2022 पासून ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपींनी ग्राहकांकडून जमा केलेली वसुली मालकाकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. या प्रकरणी गौरव कैलास वाघ (रा.पन्नाशाही नगर, लोधीपुरा, बर्‍हाणपूर), मोहम्मद तौफिक रफीक तेली (रा. लोहार मंडी, बर्‍हाणपूर) यांच्याविरोधात व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वंजारी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !