अन् नवरदेवाचे चक्क विवाह मंडपातूनच पलायन…!


And the groom actually fled from the wedding venue itself…! सोलापूर (8 फेब्रुवारी 2026) : बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे नवरदेवाने थेट विवाह मंडपातून पलायन केल्याचा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली मात्र पोलिस येताच चक्क नवरदेवाने मंडपातून धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला.

काय आहे नेमका प्रकार ?
कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विवाहाची विधी पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच परिस्थिती बिघडली. पोलिसांना पाहताच नवरदेवाने कोणालाही काही न सांगता थेट मंडपातून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला व हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

100 जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी तसेच कपिलधार देवस्थानचे विश्वस्त अशा एकूण सुमारे 100 जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला..

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या नवरदेवाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती न देता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !