दुसखेड्यातील शेतकर्‍याची चोरी झालेली ईले. मोटार तापी पात्रात आढळली


The electric motor stolen from a farmer in Dusakheda village was found in the Tapi riverbed यावल (9 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील दुसखेडा येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांची 12.5 हॉस पॉवरची ईले.मोटर 1 फेब्रुवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी चोरून नेली होती. ही मोटार नदीपात्रात सापडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
2 रोजी सकाळी राजेंद्र पाटील हे नदी वरती मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोटर आढळून आली नाही व वायर कट झालेली दिसली तात्काळ त्यांनी पोलीस पाटील संगीता विशाल दांडगे यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी लगेचच फैजपूर पोलीस स्टेशन येथे कळविण्यात आले व राजेंद्र पाटील यांना फिर्याद देण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले.फिर्याद देऊन साधारण पाच दिवस झाले असता. ती मोटर 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नदीवरील शिकार्‍यास शिकार करत असताना आढळून आली. लगेच त्यांनी पोलीस पाटील दांडगे यांना संपर्क केला. व पोलीस पाटील यांनी नदीवर जाऊन चौकशी केली असता लगेचच मूळ मालक राजेंद्र पाटील यांना नदी वरती बोलवून गावातील राजू सोनवणे व संदीप गोसावी या तरुणांच्या मदतीने ती मोटर पाण्यातून बाहेर काढण्यात आली व त्या ठिकाणावरून चोरीस गेलेली होती त्या ठिकाणी ती मोटर ठेवण्यात आली. सुमारे 25 हजार रूपये किंमतीची मोटार सापडल्याने शेतकर्‍याचे नुकसान टळले

चोरांनी साधारणत 300 ते 400 मीटर लांब पाण्यात मोटर चोरून नेलेली होती. मोटार वजनदार असल्याने त्यांनी तिला पाण्यात सोडून चोरट्यांनी पळ काढल्याचा संशय आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !