बारावी परीक्षा : यावल तालुक्यातील आठ केंद्रावर तीन हजार 83 विद्यार्थी प्रविष्ट


HSC Examination: 3,083 students appeared at eight centers in Yawal taluka यावल (9 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील आठ परीक्षा केंद्रांवर मंगळवार, 10 पासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. 10 वाजता पेपराला सुरुवात होईल. यात मराठी व उर्दु विभागातील एकुण 3 हजार 083 विद्यार्थी इंग्रजीचा पेपरासाठी प्रविष्ट आहेत.

पोलिसांचा असेल बंदोबस्त
सर्वच परीखा केंद्रांवर बैठा पथक व चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार आहे. यावल व फैजपूर शहरात प्रत्येकी दोन परीक्षा केंद्र आहे. ग्रामीण भागात चार असे तालुक्यात आठ केंद्र असून यंदा एक नवीन केंद्र चुंचाळे येथे आणी यावलचे एक केंद्र बदलण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील आठ परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून एकूण इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरवात होत आहे. या सर्व आठ परीक्षा केंद्रांना दोन कस्टडी आहेत. यावल कस्टडीत चार तर फैजपूर कस्टडीत चार असे आठ परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर सोडवतील. यावल कस्टडी प्रमुख म्हणुन सरोज पाटील व फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणुन संगीता पाटील आहेत.

आठ केंद्रावर एकूण इंग्रजी विषयाचा पेपर तीन हजार 83 विद्यार्थी प्रवेशीत आहे. सर्वच परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुखांकडून तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर विद्यार्थ्यांना हजर रहावे लागणार आहे. सकाळी 10 वाजेला मराठी व उर्दू विभागातील विद्यार्थी इंग्रजीचा पेपर सोडवणार आहेत. यंदाची परीक्षा कॉपी मुक्त होत असून परीक्षा केंद्रावर गस्ती पथक प्रमुख तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड लक्ष ठेवतील. परीक्षा केंद्राबाहेर यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त असेल.

केंद्र निहाय विद्यार्थी असे
साने गुरूजी विद्यालय यावल- 425, इंदीरा गांधी माध्यमिक विद्यालय, यावल 435, ज्योती विद्या मंदिर सांगवी- 673, सार्वजनिक विद्यालय चिंचोली- 292, पी.एस.एम.एस. हायस्कुल, बामणोद- 242, डी.एन. कॉलेज, फैजपूर- 249 व मौलाना आझाद हायस्कूल, फैजपूर- 520 तर श्री समर्थ रघुनाथ बाबा मध्यमिक विद्यालय, चुंचाळे- 246 असे इंग्रजीचे तीन हजार 83 विद्यार्थी परीक्षा देतील.

नवीन केंद्र चुंचाळे, यावल केंद्रात बदल
यंदा तालुक्यातील पश्चिम भागात चुंचाळे या गावात श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे तसेच यावल शहरातील डॉ.जाकीर हुसेन हायस्कुल केंद्र रद्द करीत त्या ऐवजी इंदीरा गांधी विद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !