ढाब्यावर ईव्हीएम आढळले : वाहन चालकाविरोधात अखेर गुन्हा


EVMs found at a roadside restaurant: A case has finally been registered against the driver सोलापूर (9 फेब्रुवारी 2026) : मोहोळ तालुक्यात (जि.सोलापूर) ढाब्यावर ईव्हीएम आढळल्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती तर या प्रकरणी सोशल मिडीयातून टीकेचा सूर वाढला होता. या प्रकरणी आता परवानगी शिवाय ईव्हीएम असलेले वाहन स्ट्राँगरूम बाहेर नेल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण
सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन (एतच् चरलहळपश) धाब्यावर आढळल्याच्या प्रकरण समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली होती. निवडणूक अधिकार्‍यांनी ते वाहन परत मागवले असताना ते परत नेण्यास टाळाटाळ केली असल्याचेही पुढे आले आहे. ईव्हीएम धाब्याबाहेर गाडीत राहिल्याने लोकांचा जमाव जमून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, असा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 222, 223 नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणुकीत सेवेत क्षेत्रीय अधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी याबाबत फिर्याद दिलीय. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

ते मतदान यंत्र राखीव स्वरुपातील
सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !