भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढ ठार
A middle-aged man was killed in a collision with an unidentified vehicle in Bhusawal भुसावळ (9 फेब्रुवारी 2026) : जळगावकडून भुसावळकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर साकेगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे पन्नास ते साठ वयोगटातील एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
साकेगाव येथे महामार्गालगत असलेल्या चहाच्या दुकानासमोर अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून संबंधित इसमास जोरदार धडक दिली. या अपघातात इसमास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मृत इसमाची ओळख पटविण्याचे तसेच अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
