भुसावळात चोरटे सैराट : गोपाळ नगरात दोन घरे फोडली


Thieves are running rampant in Bhusawal: Two houses were broken into in Gopal Nagar भुसावळ (9 फेब्रुवारी 2026) : जुन्या चोर्‍यांचा तपास रेंगाळला असतानाच सातत्याने होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांनी भुसावळकर धास्तावले आहे. गोपाळ नगर भागातील दोन बंद घरे फोडून सुमारे 99 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाी आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले शहरात?
डी.एल. हिंदी हायस्कूलच्या मागे असलेल्या गोपाळ नगर परिसरात राहणारे लखन सुखराज शर्मा (37) हे 24 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख असा एकूण 85,600 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

केवळ शर्मा यांचेच घर नव्हे, तर चोरट्यांनी शेजारील एका साक्षीदाराचे घरही लक्ष्य केले. 27 ते 28 जानेवारीच्या दरम्यान या घरातूनही 14 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दोन हजार 900 रुपयांची रोकड मिळून एकूण 99 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

याप्रकरणी लखन शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !