सोशल मिडीयावर लाखो फॅन फालोविंग असलेल्या निर्मल नवलेंचा दारुण पराभव


Nirmal Navale, who has millions of followers on social media, suffered a crushing defeat शिरुर (9 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला आहे. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख असूनही, मतपेटीत मात्र त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी नवले यांचा 300 मतांनी पराभव केला. हा निकाल नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत
निर्मला नवले या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांच्या रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या स्टाईलमुळे त्या नेहमीच व्हायरल होत राहिल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे आणि कृतीचे चाहत्यांना विशेष आकर्षण असते त्यामुळे त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असे. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ‘रिल्सची राणी’ अशीही ओळख मिळाली होती मात्र या वेळी हीच लोकप्रियता निवडणुकीत उपयोगी पडली नाही.

पाच लाखांहून अधिक फालोअर्स
निर्मला नवले या उच्चशिक्षित असून त्यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ झाली. उच्चशिक्षित, सोशल मीडियावर प्रभावी उपस्थिती आणि गावपातळीवरील सक्रियता यामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या. इन्स्टाग्रामवर त्यांच्या पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची ही प्रतिमा मतांमध्ये बदलू शकली नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !