शरद पवारांची तब्येत बिघडली : पुण्यात रुबी रुग्णालयात उपचार


Sharad Pawar’s health has deteriorated: He is undergoing treatment at Ruby Hospital in Pune पुणे (9 फेब्रुवारी 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सोमवार, 9 रोजी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होत. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते मात्र प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. माध्यमांतून माहिती कळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली.

दगदग वाढल्याने प्रकृती खालावली
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. आज अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी घरीच विश्रांती घेणे पसंत केले होते. पण त्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था
शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या ताफ्यात वैद्यकीय पथकासह कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली. काही वेळापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर सिमोन ग्रँट यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचारपद्धती ठरवली जाणार आहे. गरज भासली तर त्यांना रुग्णालयात अ‍ॅडमिटही केले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत आहे. सोमवारी सकाळपासून त्यांचा त्रास वाढला त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेही आहेत.

सुप्रिया सुळेंचा डॉक्टरांशी संवाद
शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ एक कौटुंबिक सदस्य म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये : रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना काही प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथे ठेवले जाईल. ते आयसीयूमध्ये नाहीत, तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !