भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये स्काऊट गाईड कॅम्प
भुसावळ (10 फेब्रुवारी 2026) : कोलते फाऊंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये स्काऊट गाईड कॅम्प शनिवार, 7 रोजी झाला. रेल्वे परिक्षेत्रातील डीटीसी मैदानावर झालेल्या कॅम्पमध्ये इयत्ता 5वी ते 9वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना कमी साधनांत दिवस घालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक संतोष श्रीवास यांचे मार्गदर्शन लाभले. संचालक सी.ए.रोहित कोलते व मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट उपस्थित होत्या.

ध्वजारोहणानंतर झेंडागीत व प्रार्थना सादर झाली. विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे स्तर व त्यांची उपयुक्तता समजावून देण्यात आली. नाश्ता जेवणाची व्यवस्था होती. मौखिक लेखी परीक्षा, साहसी प्रात्यक्षिके व परेड घेण्यात आली. शेवटी विद्यार्थ्यांना स्कार्फ देऊन सन्मानित केले. कॅम्प सुधा बनसोडे व सुमित दासगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला. शिक्षकवृंद व कर्मचार्यांचे विशेष सहकार्य मिळाले.







