हनुमान चालीसा पाठ वर्षपूर्ती : वर्षभरात 2850 पाठ पूर्ण
वरणगाव येथील वासुदेव परिवाराचा उपक्रम
वरणगाव (10 फेब्रुवारी 2026) : सनातन धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमानसाच्या मनामनात हनुमान चालीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवारातर्फे आयोजित संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाची वर्षपूर्ती शनिवारी 14 तारखेला साजरी करण्यात येणार आहे.
ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे अध्यामिक केंद्र रेवा कुटी,वरणगाव याठिकाणी दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम राबविण्यात येतो. डॉ. नितु पाटील आणि सहकारी वर्गाने दि.8 फेब्रुवारी 2025 ला सुरू करण्यात आलेले हा अध्यात्मिक उपक्रम असून आतापर्यंत वर्षभरात 2850 संगीतमय हनुमान चाळीसा पाठ करण्यात आले.

हनुमान जन्मोत्सव दिवशी पाठ सोबत हनुमान चाळीसाचे हवन सुध्दा करण्यात येते.या दिवशी भक्तांच्या दर्शनासाठी राम सेतू दगड ठेवण्यात येतो सोबत तीर्थ वाटप करण्यात येते.
प्रत्येक उपक्रमात सर्वात आधी पंचमुखी हनुमान पूजन,सामूहिक रामस्तुती यानंतर सर्वांनी मिळून 11 वेळा हनुमान चाळीसा चे पाठ करण्यात येतात.आरती आणि प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.
प्रत्येक उपक्रमासाठी दीपक फेंगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, योगेश मगरे, गोलू तडवी, उमेश माळी, मनोज गोसावी, चंद्रकांत बढे, सुयोग चौधरी, कृष्णा माळी, राम शेटे,र ाहुल माळी आदींची मेहनत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असते.
एक लक्ष संगीतमय हनुमान चाळीसा संकल्प..!
दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी आम्ही सुरू केलेला हा अध्यात्मिक उपक्रम अविरतपणे सुरू आहे.परिसरातील नागरीकांमध्ये याबाबत जनजागृती सोबत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमचा संकल्प 1 लाख संगीतमय हनुमान चाळीसा करण्याचा असल्याचे सदस्य कमलेश येवले म्हणाले.







