भुसावळातील प्रभाग आठमध्ये पाणीटंचाई : नवीन ट्यूबवेल्ससह विहिरींची व्हावी स्वच्छता ; सुरज चौधरींची मागणी
Water shortage in Ward 8 of Bhusawal: New tubewells along with cleaning of wells; Suraj Chaudhary’s demandभुसावळ (10 फेब्रुवारी 2026) : शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये पाणीप्रश्न गंभीर समस्या बनली आहे. महिनाभरावर उन्हाळा आल्याने पाणीप्रश्न आणखीनच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी या भागात पालिकेने नव्याने बोअरवेल्स (ट्यूबवेल्स) कराव्यात तसेच प्राचीन विहिरींची स्वच्छता करून तेथे पाण्याची मोटार बसवल्यास नागरिकांची पाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. या संदर्भातील निवेदन या भागातील नागरिक सुरज रवींद्र चौधरी यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.
पाणी प्रश्न गंभीर
सुरज चौधरी यांच्या निवेदनानुसार, प्रभाग आठमध्ये पाणीप्रश्न गंभीर समस्या बनली आहे. या भागात पालिकेने नव्याने बोअरवेल्स केल्यास तसेच विहिरींची डागडूजी करून स्वच्छता केल्यास नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबणार आहे. पालिका प्रशासन तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.






