!-- afp header code starts here -->

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात अर्थसंकल्पावर व्याख्यान


भुसावळ (10 फेब्रुवारी 2026)  : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ‘आर्थिक बजेट 2026’ विषयावर भुसावळ कला वाणिज्य व पु. ओं.नाहाटा महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.किरण अमृत वारके यांचे व्याख्यान झाले.

अर्थसंकल्पावर सखोल मार्गदर्शन
आपल्या व्याख्यानात त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याची गरज तसेच अर्थसंकल्पातील खर्च व जमेच्या बाजू आणि त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य जीवन धांडे होते. त्यांनी अर्थसंकल्पाचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारा परिणाम व त्याचे महत्त्व सांगितले.

प्रास्ताविकात डॉ.उज्वला पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट सांगितले. सूत्रसंचालन प्रा.लता साळुंखे तर आभार श्रावणी जितेंद्र अशोक चौधरी हिने मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.निलेश गुरचळ, डॉ.गिरीश कोळी, प्रा.भावना शंकपाळ, प्रा.पंकज फालक, प्रा.रमाकांत वासनिक, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.विनोद भालेराव, डॉ.किरण खेटे यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !