भुसावळातील प्रभाग क्रमांक 25 मधील स्वच्छतेचा प्रश्न सोडवा : नगरसेविका डॉ.छाया देशमुख यांची मागणी
भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत साफसफाईसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने परिसरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ.छाया मु. फालक (देशमुख) यांनी भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे लेखी निवेदन सादर करीत स्वच्छता मोहिम राबवण्याची मागणी केली आहे., दरम्यान, पालिका प्रशासनाला निवेदन देऊन एक महिना लोटला तरी पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने डॉ.फालक यांनी तीव्र संताप व्यक्त
घंटागाडीची वाढवावी संख्या
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील कचरा उचल, गटारांची स्वच्छता, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची देखभाल यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे आहेत त्यामुळे काही भागांत अस्वच्छता निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यासोबतच कचरा घंटागाडीची संख्या वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

प्रभागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, स्वच्छता कर्मचारी व कचरा घंटागाड्या तात्काळ वाढवाव्यात, अशी ठाम मागणी नगरसेविका डॉ. छाया फालक यांनी प्रशासनाकडे केली आहे. स्वच्छ व निरोगी नागरिक हेच आमचे ध्येय आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या निवेदनाची दखल घेऊन नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






