!-- afp header code starts here -->

आडगावच्या वयोवृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू


Elderly man from Adgaon dies after falling into well एरंडोल (11 फेब्रुवारी 2026) : एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील वयोवृद्धाचा विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता घडली. नारायण धोंडू सातपुते (64, रा.आडगाव, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे.

तोल गेल्याने गमावला जीव
नारायण सातपुते हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ते गावात फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचे सांगून ते घरातून निघून गेले मात्र गावातील मराठी शाळेच्या बाजूला ग्रामपंचायतच्या वहिरीच्या कठड्यावर बसले असतानाच त्यांचा अचानक तोल गेल्याने ते विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेवून त्यांना विहिरीतून बाहेर काढले आणि एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !