जळगाव-भादली दरम्यान अनोळखीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
जळगाव (11 फेब्रुवारी 2026) : जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एक अनोळखी व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव ते भादली रेल्वेच्या दरम्यान सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता अप लाईनवरील रेल्वे खांबा क्रमांक 424च्या 22 आणि 24 जवळ एका अनोळखी अंदाजे 50 ते 55 वर्षीय प्रौढ व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाला. यावेळी लोको पायलट गुलाम सरोवर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी आले व त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.







