!-- afp header code starts here -->

विमानच नव्हे, पायलटही बदलला ! सत्य बाहेर आल्यास अनेकजण अडचणीत येतीत : पिंकी माळीच्या वडिलांचा खळबळजनक दावा


Not only the plane, but also the pilot changed! If the truth comes out, many people will be in trouble: Pinky Mali’s father’s sensational claim मुंबई (11 फेब्रुवारी 2026) : विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपांची मालिका अद्यापही कायम आहे. आमदार रोहित पवार यांनी विविध दावे केल्यानंतर आता या अपघातात मरण पावलेल्या फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्या वडिलांनी सत्य समोर आल्यास अनेकजण अडचणीत येतील, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे. बारामती येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू
अजित पवार यांच्या विमानाचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला. त्यात अजित पवार व पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिक नव्हे तर विमानही बदलण्यात आले होते. यापूर्वी पिंकी माळीने चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र त्यांना पांढर्‍या रंगाचे विमान देण्यात आले. असे का?

सकाळी मुंबईत कुठे ट्रॅफिक असते?
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे विमानाचा पायलट पोहोचू शकला नाही, हा दावाही शिवकुमार माळी यांनी खोडून काढला आहे. मुंबईत सकाळी सहा वाजता कोणत्या भागात ट्रॅफिक असते? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

विमान कंपनीने आमच्याशी संपर्क साधला नाही
पिंकीने आदल्या दिवशी मला फोन करून आपण अजित पवारांसोबत प्रवास करणार असल्याचे सांगितले होते. बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी बोलेन असे ती म्हणाली होती. तुला काही बोलायचे आहे का? असे विचारले असता तिने आपल्याला खूप काही बोलायचे आहे, असे सांगितले. पण दुर्दैवाने लँडिंगवेळी अपघात झाला. दुर्दैव म्हणजे, पिंकीच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान कंपनीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !