भुसावळातील बालाजी लॉनमधून महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास


भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : शहरातील बालाजी लॉन मंगल कार्यालयातून महिलेची पर्स लंपास करण्यात आली. या पर्समध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेसह दोन लाख 49 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी झाली चोरी
उज्ज्वल प्रबोध भावे (50, रा. प्रल्हाद नगर, भुसावळ) या 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी भुसावळ शहरातील बालाजी हॉल येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या असता दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास त्या हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सोफ्यावर ठेवलेली पर्स लांबवली.


तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !