!-- afp header code starts here -->

बसमधील गर्दीचा फायदा घेत जळगावच्या महिलेचे 38 ग्रॅमचे दागिने लांबवले


Taking advantage of the crowd in the bus, a Jalgaon woman’s 38 grams of jewelry was stolen जळगाव (11 फेब्रुवारी 2026) : धावत्या बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने 38 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
जळगावच्या पिंप्राळ्यातील सुनीता अशोक बारी (52) या 10 फेब्रुवारी रोजी सकाळी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर बसने पाळधी येथे एका लग्नासाठी जात असताना सकाळी 11.45 ते दुपारी 12.50 च्या सुमारास बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापत त्यातील 38 ग्रॅम वजनाचे व अंदाजे 90 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले


जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भटू पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !