!-- afp header code starts here -->

होळीसाठी प्रवाशांना मोठा दिलासा : मध्य रेल्वेकडून 209 तर भारतीय रेल्वेकडून देशभरात 1410 विशेष गाड्यांची घोषणा


Big relief for passengers for Holi : Central Railway announces 209 special trains and Indian Railways announces 1410 special trains across the country भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एकूण 209 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा यासाठी ही विशेष सुविधा देण्यात आली आहे.

विशेष गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलीत विशेष, वातानुकुलीत सह शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी तसेच काही अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या प्रामुख्याने मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई आदी प्रमुख मार्गांवर धावणार आहेत.


दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे देशभरात एकूण 1410 होळी विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे सणाच्या काळात प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सुविधांसाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना केल्या असून, स्थानकांवर पुरेशा प्रमाणात तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

या होळी विशेष गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !