फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ : 8.18 लाख प्रवाशांकडून 68.86 कोटींचा दंड वसूल
Excitement among casual passengers : Fines of Rs 68.86 crore collected from 8.18 lakh passengers भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायी प्रवासाची सुविधा देण्याच्या उद्देशाने भुसावळ रेल्वे मंडलाने विनातिकीट व अनधिकृत प्रवास करणार्या प्रवाशांविरोधात कडक कारवाई सुरू ठेवली आहे. वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमधून उल्लेखनीय परिणाम साध्य झाले आहेत.
या कालावधीत भुसावळ मंडलाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अवैध किंवा अयोग्य प्रवास करत असलेल्या तब्बल 8.18 लाख प्रवाशांना पकडले. मागील वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये ही संख्या 5.82 लाख इतकी होती. यामध्ये सुमारे 40 टक्कंची वाढ नोंदविण्यात आली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
तिकीट तपासणीदरम्यान दंडापोटी एकूण 68.86 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, मागील वर्षी ही रक्कम 42.87 कोटी रुपये होती. त्यामुळे दंड वसुलीत तब्बल 61 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे.
भुसावळ मंडलात स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, किल्लेबंदी तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी अभियान अशा बहुआयामी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ही कारवाई मेल-एक्स्प्रेस, प्रवासी व विशेष गाड्यांमध्ये सातत्याने केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच वैध तिकीट खरेदी करावे. प्रवासी बुकिंग काऊंटर, एटीव्हीएम, आयआरसीटीसी संकेतस्थळ ुुु.ळीलींल.ले.ळप किंवा रेलवन पच्या माध्यमातून तिकीट काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनातिकीट प्रवास टाळून कायदेशीर व जबाबदारीने प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई व गैरसोय टाळता येईल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






