!-- afp header code starts here -->

पाच हजारांची लाच भोवली : शिरपूर तालुका कृषी अधिकार्‍यासह दोघे धुळे एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribe of Rs. 5,000: Shirpur taluka agriculture officer and two others caught by Dhule ACB भुसावळ (12 फेब्रुवारी 2026) : प्रमाणित केलेल्या गव्हाच्या बियाण्यांचे अनुदान मिळण्यासाठी तसेच शेतकर्‍यांची यादी प्रमाणित करण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय हिंमतराव पवार (43) व डाटा इंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील (31) यांना धुळे एसीबीने गुरुवार, 12 रोजी सायंकाळी अटक केल्याने कृषी विभागातील लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
मौजे बभळाज, ता.शिरपूर येथे तक्रारदाराचे शासनमान्य बी-बियाणे आणि खत विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत, अकोला यांच्याकडून ‘कृषी उन्नती योजना’ राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरीत केले जाते. तक्रारदाराने 2025-2026 मध्ये 90 शेतकर्‍यांना विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यावरील एक लाख 40 हजार रुपये शासकीय अनुदान महामंडळाकडून मिळण्यासाठी शिरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवार, 10 रोजी कागदपत्रांसह संपर्क साधला. यावेळी डाटा इंट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याने बुधवार, 11 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच पडताळणीत ऑपरेटर यांनी लाच मागणी केल्याचे व तालुका कृषी अधिकार्‍याने लाचेला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी ऑपरेटरने लाच स्वीकारल्यानंतर कृषी अधिकार्‍यालाही अटक करण्यात आली.


यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !