वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सदस्यपदी निवड
मोठे वाघोदा, ता.रावेर (11 फेब्रुवारी 2026) : श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, मोठा मठाचे गादीपती ज्योतिषाचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्यकरणी सदस्यपदी निवड करण्यात आली. अमरावती येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेची बैठक 8 रोजी महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा व परिषदेचे कार्याध्यक्ष उपाध्य कुलाचार्य व पंथीय आचार्य यांच्या उपस्थितीत झाली. या निवडीबद्दल वाघोदेकर बाबा शास्त्री यांची आमदार अमोलजावळे यासह पंचक्रोशीतील संत महंत उपदेशी भाविक यांनी अभिनंदन केले.






