वरणगावात भूमिगत गटार प्रकल्प मंजूर करा : लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी
वरणगाव विकासासाठी 200 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर
Approve underground sewer project in Varangaon: Demand of publicly appointed Mayor Sunil Kale भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : वरणगाव शहरात 82 कोटीचा भूमिगत गटार प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव नुकताच मंत्रालयात सादर केला.
वरणगावच्या चौफेर विकासाचा प्रस्ताव
यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद यांच्याकडे पत्र देऊन व भ्रमणध्वनी करून तातडीने राज्याच्या समितीकडे पाठविण्यात यावी, अशा सुचना राज्याचे जलसंदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या. यावेळी वरणगाव नगरपालिकेच्या वतीने फुलगाव फाटा ते साई बाबा मंदिर दरम्यान दुभाजक टाकून लाईट लावणे प्रशस्त महामार्गासाठी 20 कोटींचा नदी, वरणगाव शहरातील मुख्य रस्ते ओपन स्पेस विकसित करणे, संपूर्ण शहरात लाईट व्यवस्था करणे, क्रीडांगणासाठी निधी, व्यापारी संकुलासाठी निधी, जुनी नगरपरिषद कार्यालय, व्यापारी संकुलासाठी निधी मिळणे व बांधणे अल्पसंख्यांक निधीतून शादिखाना हॉल, ग्रंथालय बांधणे, दलित वस्तीमधून मागासवर्गीय सर्व समाजाला सामाजिक हॉलसाठी निधी मागणीसह 200 कोटीच्या कामांचे प्रस्ताव मंजूरीसाठी खास बाबा म्हणून मंजुरीच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

लवकरच मिळणार मंजुरी
मंत्री गिरीश महाजन यांनी वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांना यावेळी सांगितले की, तू काळजी करू नको आपण योजने सह नगरविकास विभागातून निधी मंजुरीसााठी प्रयत्न करू. यावेळी नगरसेवक नाना चौधरी, जनसेवक अजमल खान, जनसेवक फझल शेख, शहराध्यक्ष सुनील माळी, जनसेवक आकाश निमकर, जनसेवक कुंदन माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याला यश नक्की येईल, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी सांगितले.






