!-- afp header code starts here -->

भर दिवसा झालेल्या चाकूहल्याने भुसावळ हादरले : अल्पवयीन बालक गंभीर

दुसरा तरुणही झाला जखमी : किरकोळ वादातून घटना


Bhusawal shaken by broad daylight stabbing attack: Minor child critical भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : शहरातील गजबजलेल्या रजा टॉवर चौकात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भरदुपारी चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना गुरुवादी दुपारी चार वाजता घडली. या घटनेत तेरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून आणखी एक तरुणही जखमी झाला आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

किरकोळ वादातून घटना
प्राथमिक माहितीनुसार, एका तेरा वर्षीय मुलगा व एका तरुणामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तेरा वर्षीय मुलाच्या डाव्या कानाजवळ चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेला मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.


या दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या दुसर्‍या एका तरुणाच्या डाव्या मांडीवरही चाकूने वार करण्यात आला. त्यात तोही जखमी झाला. घटनेनंतर दोन्ही जखमींना तत्काळ भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.आसीफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरा वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असून तो काही काळ बेशुद्ध होता. पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलविण्यात आले तर दुसर्‍या जखमी तरुणावर भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. दोन्ही जखमी उपचाराधीन असल्याने त्यांचे जबाब नोंदविणे शक्य झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. भरदिवसा गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !