!-- afp header code starts here -->

जळगावात खळबळ : रामेश्वर कॉलनीतील अपार्टमेंटमधील 18 दुचाकी जळाल्या


Excitement in Jalgaon: 18 two-wheelers burnt in an apartment in Rameshwar Colony जळगाव (14 फेब्रुवारी 2026) : जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच अपार्टमेंटमधील तब्बल 18 दुचाकी जळाल्या आहेत. या दुचाकींना कुणी आग लावली की त्या तांत्रिक अडचणीनंतर जळाल्या? याबाबतचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. जळगावच्या मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथे साई गजानन रेसिडेन्सी येथील अपार्टमेंटमधील तब्बल 18 वाहनांना आग लागल्याचा प्रकार शनिवारी पहाटे दोन वाजता समोर आल्यानंतर वाहनधारक धास्तावले आहेत.

काय आहे नेमका प्रकार ?
मेहरूण परिसरामध्ये रामेश्वर कॉलनीत साई गजानन रेसिडेन्सी ही मोठी सदनिका आहे. या अपार्टमेंटमध्ये अनेक रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या दुचाकी अपार्टमेंटच्या खाली नेहमीप्रमाणे उभ्या केल्या असताना शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक दुचाकींना आग लागली. प्रथम मजल्यावर राहणार्‍या एका व्यक्तीला लघुशंका लागल्यानंतर तो जेव्हा बाहेर गॅलरीत आला तेव्हा त्याला आग दिसली. त्याने आरडाओरडा करून अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांना बोलावले.


पेट्रोल टाक्यांनी घेतला स्फोट
पाण्याची मोटार लावून पाणी टाकण्याचा प्रयत्न केला मात्र काही दुचाकींच्या पेट्रोलच्या टाक्यांचा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी मारण्यास अडचणी आल्या.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी येऊन आग आटोक्यात आणली. हीघटना एखाद्या माथेफिरूने केली असल्याचा नागरिकांना संशय आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याचे काम पोलीस व नागरिकांकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या रहिवाशांच्या दुचाकी खाक
आत्माराम जाधव, शिरीष सोनवणे, अजय कापुरे, सुरेश सोनवणे, शरद बोरसे, ललित वेडीस, ज्योती पवार, राजेश खिडके, भारत तामनेरकर, किरण पाटील, सुधीर पाटील, मनोज मोरे, धोंडू बडगुजर यांच्या दुचाकींसह सागर पाटील व संग्राम विसपुते यांच्या प्रत्येकी दोन दुचाकी जळून खाक झाल्या.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !