!-- afp header code starts here -->

भालोद-म्हैसवाडी रस्ता कामातील गैरप्रकार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रार


यावल (14 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील भालोद-म्हैसवाडी रस्ता कामातील गैरप्रकार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ची तक्रार आमदार अमोल जावळे यांच्या सह सार्वजनिकबांधकाम विभागाकडे करण्यात आली. या स्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदारांकडे तक्रार
भालोद-म्हैसवाडी रस्त्याच्या कामा बाबत स्वप्निल जमनादास चौधरी (म्हैसवाडी, ता.यावल) यांनी आमदार अमोल जावळेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मतदारसंघातील एक जागरूक नागरिक या नात्याने हे पत्र लिहित आहे. आपल्या विशेष प्रयत्नातून आणि निधीतून भालोद ते म्हैसवाडी या बहुप्रतिक्षित रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ आपले ऋणी आहोत.परंतु, अत्यंत खेदाने आपणास कळवू इच्छितो की, सदर रस्त्याचे काम करत असलेला ठेकेदार कामात कमालीचा कामचुकारपणा आणि हलगर्जीपणा करत आहे.


असे आहे आहेत आक्षेप
या कामाबाबतचे मुख्य आक्षेप खालीलप्रमाणे आहेत. निकृष्ट साईड पट्ट्या: नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांवर चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. काळ्या मातीचा वापर: संबंधित ठेकेदार मुरूम टाकण्याऐवजी, रस्ता खोदताना निघालेली नाल्यातील काडी माती साईड पट्ट्यांवर टाकत आहे.भविष्यातील धोका: ही माती पावसामुळे दबली जाऊन रस्ता खचण्याची आणि कडा फुटण्याची 100टक्के खात्री आहे. यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण विकासकामांसाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, मात्र ठेकेदाराच्या अशा वागणुकीमुळे आपल्या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे. तरी आपण वैयक्तिक लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांना या कामाची तात्काळ पाहणी करण्याचे आदेश द्यावेत आणि निकृष्ट दर्जाचे काम थांबवून नियमानुसार दर्जेदार काम करून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !