!-- afp header code starts here -->

लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळांची अडचण मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पाठीशी !


Minister Narhari Jirwala is in trouble due to the bribery case, but Deputy Chief Minister Sunetra Pawar is on his side! मुंबई (15 फेब्रुवारी 2026) : कार्यालयातील लिपिकाच्या लाचखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत त्या झिरवाळ यांच्यासह पक्षाच्या ध्येय धोरणांसंदर्भात एखादा ठोस निर्णय घेतला जाण्याचा अंदाज आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. विरोधकांनी या प्रकरणी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने ते संकटात सापडलेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर झिरवाळ यांनी आपला या प्रकरणाशी संबंध आढळला तर आपण राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले आहे. पण शनिवारी सकाळपासूनच ते नॉट रिचेबल झाल्यामुळे त्यांच्यावर असलेला दबाव स्पष्ट झाला. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिलेत.

सोमवारी सायंकाळी बोलावली बैठक
यासंबंधीच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत नरहरी झिरवाळ प्रकरणात नेमके काय झाले? व पुढे काय करता येईल? या प्रश्नांवर सदस्यांची मते जाणून घेणार आहेत. प्रस्तुत बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीवरही चर्चा होणार आहे. पुढील 15 दिवसांत यासंबंधीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असा अंदाज आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !