शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई : कोट्यवधींचे हायवा ट्रक लांबवणार्या हरियाणातील आंतरराज्यीय टोळीला अटक
Major action by Shirpur city police : Inter-state gang from Haryana arrested for smuggling highway trucks worth crores शिरपूर (15 फेब्रुवारी 2026) : शिरपूरातून एक कोटी 10 लाख रुपये किंमतीचे दोन महागडे हायवा ट्रक लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरपूर शहर पोलिसांनी शेकडो सीसीटीव्हींची पडताळणी तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर राजस्थान-हरियाणातील कुख्यात आंतरराज्यीय टोळीतील चार सदस्यांना अटक केली आहे. आरोपींकडून दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहे.
या आरोपींना अटक
ईरफान उस्मान मेव (40, बडका, ता.हातीन, जि.पलवल, हरियाणा), नियामत दिनू मेव (34, हातीन, जि.पलवल, हरियाणा), कालू गफूरखा मेव (50, भिलवाडा हुसेन कॉलनी, ता.भिलवाडा), महावीर प्रसाद भवनलालजी शर्मा (50, पानसल, ता.भिलवाडा, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींनी शिरपूर येथून दोन्ही वाहन चोरण्यासाठी वापरलेली बलेनो कार (एच.आर.52 जी.7875) ही जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शोध पथकातील हवालदार रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरीफ तडवी, प्रशांत पवार, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ आदींच्या पथकाने केली.







