!-- afp header code starts here -->

यावलला गोमांस विक्री : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


यावल (15 फेब्रुवारी 2026) : यावल शहरातील चोपडा रोडवर असलेल्या जुन्या कत्तलखान्यात अवैधरित्या गोमांस विक्री होत असताना यावल पोलिसांनी कारवाई करीत 105 किलो गोमांस जप्त केले. पोलिस येताच चार संशयीत पासार झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
यावल शहरात चोपडा रोडवर नगरपालिकेच्या जुन्या कत्तलखान्यात शुक्रवारी काही जण अवैधरित्या गोमांस विक्री करत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे पोलिसांचे पथक दाखल झाले. पथकाला पाहून तिथून चार जणांनी मुद्देमाल सोडून तेथून पळ काढला. चार जणांकडील 105 किलो गोमांस व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !