!-- afp header code starts here -->

भुसावळात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह : गुलाबाचा सुगंध अन् भेटीगाठींचा वर्षाव

खरेदीसाठी गिफ्ट सेंटर्समध्ये तरुण-तरुणींसह नवविवाहितांची मोठी गर्दी


भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’चा जल्लोष शनिवारी शहरभर पाहायला मिळाला.सकाळपासूनच तरुण-तरुणींमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.सोशल मीडियावरील शुभेच्छांसोबतच प्रत्यक्ष भेटीगाठी आणि आकर्षक भेटवस्तू देण्यावर तरुणाईचा अधिक भर होता. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमधील गिफ्ट सेंटर्स ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होती. तर गुलाबाचे फूले खरेदी करण्यासाठी सुध्दा हार-फुलांच्या दुकानांवर युवकांची गर्दी होती.

नवीन बुकेंने वेधले लक्ष
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की गुलाबाचं फूल आलंच,मात्र, यंदा पारंपरिक बुकेपेक्षा ‘नवीन डिझाइनच्या बुके’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.आकर्षक वेष्टन आणि चॉकलेट्सचा वापर करून तयार केलेले गुलाबाचे बुके युवक-युवतींनी एकमेकांना देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर्षी केवळ टेडी बिअर किंवा चॉकलेट्सवर न थांबता, प्रेमाचे प्रतीक म्हणून राधा-कृष्णाच्या मूर्ती खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल अधिक दिसून आला.

टेडी बेअर आणि ज्वेलरी मुलींच्या आवडीचे टेडी बेअर आणि नाजूक ज्वेलरी सेटला चांगली पसंती मिळाली.पर्सनलाइज्ड गिफ्ट्समध्ये फोटो फ्रेम, स्प्रे आणि टेडी बेअरचे छोटे की-चेन्स तरुणांच्या पसंतीस उतरले. अ‍ॅक्सेसरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे आणि सुगंधी अत्तर यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.एकूणच, महागड्या भेटवस्तूंसोबतच भावनांना महत्त्व देत शहरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !