!-- afp header code starts here -->

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : प्रयागराज ते मुंबई 44 साप्ताहिक रेल्वेगाड्या भुसावळमार्गे धावणार

17 फेब्रुवारी ते 14 जुलैदरम्यान दर मंगळवारी मुंबईहून विशेष सेवा ; होळी व उन्हाळी गर्दीचा ताण कमी होणार


Big relief for railway passengers: 44 weekly trains from Prayagraj to Mumbai will run via Bhusawal भुसावळ (15 फेब्रुवारी 2026) : रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते प्रयागराज दरम्यान 44 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून, खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. होळी व उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यास या सेवेमुळे मदत होणार आहे.

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
04102 साप्ताहिक विशेष गाडी 17 फेब्रुवारी ते 14 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी 4.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. दुसर्‍या दिवशी रात्री 12.50 वाजता भुसावळ येथे पोहोचेल आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रयागराज येथे दाखल होईल. या गाडीच्या एकूण 22 फेर्‍या होणार आहेत. त्यापैकी 17 ते 24 फेब्रुवारी व 7 ते 14 एप्रिल या कालावधीत 4 अतिरिक्त फेर्‍या, 3 ते 31 मार्चदरम्यान होळी विशेष 5 फेर्‍या तसेच 21 एप्रिल ते 14 जुलैदरम्यान उन्हाळी विशेष 13 फेर्‍या चालवण्यात येणार आहेत.

04101 साप्ताहिक विशेष गाडी 16 फेब्रुवारी ते 13 जुलैदरम्यान प्रत्येक सोमवारी सायंकाळी 6.00 वाजता प्रयागराज येथून सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी 7.50 वाजता भुसावळ येथे आगमन होईल आणि त्याच दिवशी दुपारी 2.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या देखील 22 फेर्‍या होणार असून, 16 ते 23 फेब्रुवारी व 6 ते 13 एप्रिलदरम्यान 4 अतिरिक्त फेर्‍या, 2 ते 30 मार्चदरम्यान होळी विशेष 5 फेर्‍या तसेच 20 एप्रिल ते 13 जुलैदरम्यान उन्हाळी विशेष 13 फेर्‍या धावतील.

या विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी (04102 साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना व माणिकपूर येथे थांबा देण्यात येणार आहे. गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 द्वितीय आसन तसेच 2 गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.

04102 या गाडीचे आरक्षण 14 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच खठउढउच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट व्यवस्था यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध राहील.

या विशेष सेवेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील प्रवाशांना थेट लाभ होणार असून, सणासुदीच्या काळातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !