!-- afp header code starts here -->

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात ड्युटी लावण्यावरून दोन कर्मचार्‍यांमध्ये तुंबळ हाणामारी


A scuffle broke out between two employees at Chopra Rural Police Station over duty assignment जळगाव (15 फेब्रुवारी 2026) : ड्युटी लावण्याच्या वादातून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन कर्मचार्‍यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली व या वादात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले. एकावर धुळ्यात तर दुसर्‍यावर चोपडा येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिस कर्मचारीच एकमेकांशी भांडल्याने या बाबीची जिल्हाभर चर्चा रंगत आहे. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी हाणामारी करणार्‍या पोलिसांची नावे आहेत.

वादातून घडली घटना
दोन्ही कर्मचारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या चार ते पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. काही महिन्यांपासून दोघांमध्ये धुसफुस सुरू होती व शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून दोघा पोलिसांमध्ये पुन्हा वाद झाले. वाद एवढा विकोपाला पोहोचला की दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला मार लागला. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी हाणामारी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत माध्यमांना सविस्तर माहिती दिली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !