!-- afp header code starts here -->

किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन


Inauguration of Lord Eklavya’s memorial at Kingaon Khurd यावल (15 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील इचखेडा रोडावरील एकलव्य नगरात भगवान एकलव्या यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.व जंयती निमित्ताने अभिवानाचा कार्यक्रम पार पडला.

यांची होती उपस्थिती
किनगाव खुर्द ता.यावल येथे इचखेडा रोडवरील एकलव्य नगरात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. एकलव्य नगरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, ग्रामपंचायत सदस्या शामकांत महाजन यांच्याहस्ते भगवान एकलव्य यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी निलेश महाजन, विक्रम भीलसह समाज बांधवांची उपस्थिती होती.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !