!-- afp header code starts here -->

राजूर शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन : दोषींवर कारवाईची शेतकर्‍याची मागणी


Illegal minor mineral mining in Rajur Shivar : Farmer demands action against culprits बोदवड (16 फेब्रुवारी 2026) : मौजे राजूर ता. बोदवड येथील गट नं. 162 / 2 मधील शेतातून सर्रासपणे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची तक्रार शेतकरी लक्ष्मण गणेशराव देशमुख (बोदवड) यांनी बोदवड तहसीलदारांसह संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

काय आहे शेतकर्‍याचा आरोप ?
शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार, राजूर ता. बोदवड जि. जळगाव येथील गट नं. 162/2 या माझ्या मालकीच्या शेतातून जे.सी.बी. व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती अवैधरित्या चोरी करून नेण्यात आली. या संदर्भात महसूल विभागाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी करून अहवाल देखील तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मात्र अहवाल तयार होऊनही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

माती चोरी करणारे जे.सी.बी. मालक, ऑपरेटर, ट्रॅक्टर चालक व माती खरेदी करणार्‍यांविरुद्ध दंडात्मक अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गौण खनिज चोरीमुळे माझे आर्थिक नुकसान झाले असून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत. प्रकरण चालू आहे असे सांगून प्रत्यक्ष कारवाई टाळली जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून राजकीय दबावातून कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकर्‍याने केला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तयार झालेल्या अहवालाच्या आधारे तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. संबंधित दोषींवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्‍याने करीत शासनाच्या महसुलाची व झालेल्या नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !