जळगावात धाडसी घरफोडी : चार लाखांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Jalgaon: Property worth four lakhs looted जळगाव (17 फेब्रुवारी 2026) : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवार परिसरातील बंद घरातून चोरट्यांनी चार लाख सहा हजारांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
संदीप अशोक पाटील (वय 37, रा. मनुमाता नगर, खेडी शिवार) हे शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत 14 ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान घराच्या लोखंडी दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून एकूण किंमत चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल लांबवला.

या प्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.







