!-- afp header code starts here -->

हरताळेत चोरट्यांनी दोन घरे फोडली : सहा लाखांचा ऐवज चोरीला


Thieves break into two houses during hartale : Property worth six lakhs stolen मुक्ताईनगर (17 फेब्रुवारी 2026) : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच लाख 91 हजार 693 रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

धाडसी चोरीमुळे खळबळ
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे रवींद्र भगवान चौधरी (51) आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासह शेजारील रहिवासी रामभाऊ मधुकर पाटील यांचे घर बंद असताना, चोरट्यांनी 15 ते 16 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री दोघांचे बंद घर फोडून घरातून सोन्याच्या दागिण्यांसह पाच लाख 91 हजार 693 रुपयांचा ऐवज लांबवला.

सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ माजली. रवींद्र चौधरी यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !