!-- afp header code starts here -->

यावल नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या पुढाकाराने कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांचे उपोषण सुटले

पगार वाढ जाहिर : सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मध्यस्थीने तोडगा


The hunger strike of the contractual sanitation workers ended on the initiative of the Yaval Mayor and the corporators यावल (17 फेब्रुवारी 2026) : यावल नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या सफाई कंत्राटी कामगारांचे उपोषण सोमवारी दुपारी सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. नगराध्यक्षा छाया पाटील यांनी सत्ताधार्‍यांसह विरोधक अशा सर्व नगरसेवकांना एकत्र आणत संबंधित मक्तेदार कंपनीच्या व्यवस्थापकांशी व उपोषण कर्त्यांकामगारांची मध्यस्थी करीत चर्चा केली. पगारवाढीसह किमान वेतना संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. वाढ केलेला पगार जानेवारीपासून लागू केला जाणार आहे.

विविध मागण्यांसाठी उपोषण
यावल नगरपरिषद कार्यालयासमोर नगरपरिषदेमधील कंत्राटी सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कामगार यांच्यावतीने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेकडून मंगळवार, 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण छेडण्यात आले होते. चौथ्या दिवसी केलेली मध्यस्थी फिस्कटली होती तर सोमवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी नगराध्यक्ष छायाताई पाटील, भाजपाच्या गटनेत्या नंदा महाजन, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक रूबाब तडवी, उमेश फेगडे, सागर चौधरी, कदीर खान यांच्या सह सत्ताधारी गटासह विरोधी गटातील सर्वच नगरसेवकांनी एकत्र येत शहरातील स्वच्छतेच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला.

पगार वाढीसह सकारात्मक निर्णय
मक्ता देण्यात आलेल्या पुणे येथील दिशा कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोडीसाठी चर्चा केली. कामगारांच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवालसह सर्व कंत्राटी कामगार यांच्या सोबत मध्यस्थीची चर्चा घडवून आणली. यात किमान वेतन संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तसेच कामगारांच्या वेतन वाढ संदर्भात निर्णय घेण्यात आला व तोडगा काढत उपोषण मागे घेण्यात आले. कर्मचारी विनोद बारसे, रोहित सोनवणे, अब्दुल वाहिद, शेख रईस, गणेश खंडारे, विक्की गजरे, मनोज खंडारे, ऋषिकेश गजरे, पितांबर सोनवणे सह कर्मचार्‍यांनी लिंबु पाणी घेवून उपोषण सोडवण्यात आले.

अशी होणार पगारवाढ
मक्तेदार ट्रॅक्टर कर्मचार्‍याला पूर्वी 280 रुपये आता 400 रुपये, झाडझूड करणार्‍या कर्मचार्‍याला पूर्वी 180 रुपये तर आता 267 रुपये, घंटागाडीवरील कर्मचार्‍याला पूर्वी 260 रुपये आता 333 रुपये, कचरा संकलन केंद्रावरील कामगारांना पूर्वी 250 रुपये तर आता 317 रुपये, गटार साफ करणार्‍या कर्मचार्‍याला पूर्वी 230 रुपये तर आता 317 रुपये रोज व रात्रपाळी कामगारांना पूर्वी 260 रूपये तर आता वाढ करून 333 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले.

प्रशासक काळातील चूक
संबधीत मक्तेदारास मक्ता देतांना प्रशासक काळातच चूक झाली आहे. त्याच वेळी कामगारांच्या वेतन तसेच किमान वेतन संदर्भातील निर्णय झाला पाहिजे होता मात्र तो झाली नाही. आता सभागृहातील सर्व सत्ताधार्‍यांसह विरोधकांना विश्वासात घेवून या कामगारांच्या संर्दभात योग्य निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न करू व भविष्यात अशी अडचण येणार नाही याची काळजी घेवू, असे प्रसंगी नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी सांगितले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !